टाटाने 1 लाख नेक्सॉनची केली विक्री
नवी दिल्ली :
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने आपल्या नेक्सॉन इलेक्ट्रीक वाहनांच्या बाबतीमध्ये नवा विक्रम साध्य केला आहे. कंपनीने 1 लाख नेक्सॉन इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करण्यामध्ये यश मिळविली आहे.
भारतात सध्याला पाहता 2 लाख 50 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने कंपनीची कार्यरत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांप्रती प्रगती करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. एकंदरीत इलेक्ट्रिक वाहनांच्या योगदानांमध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये टाटा मोटर्सचे योगदान लक्षणीय राहिले आहे. 2020 मध्ये नेक्सॉन इव्ही गाडी लाँच केल्यानंतर या गटामध्ये बाजारात आपली मजबूत पकड बनविली आहे. अलिकडेच 1 लाखांहून अधिक वाहनांची विक्री करण्यात आली आहे. एकंदर इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा विचार करता अडीच लाख इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर सध्याला दौडताना दिसत आहे. 2018 मध्ये कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या सादरीकणाच्या प्रवासाला सुरूवात केली होती. इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणाच्या दृष्टिने सहाय्यकारक ठरत असून ही बाब लक्षात घेतच जास्तीतजास्त इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याचा विचार कंपनी करते आहे. लवकरच कंपनी इलेक्ट्रिक सियारा बाजारात सादर करणार असल्याची माहिती मिळते आहे.