For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटाने बेंगळूरमध्ये खरेदी केली 38 एकर जमीन

06:02 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटाने बेंगळूरमध्ये खरेदी केली 38 एकर जमीन
Advertisement

टाटाकडून  2,300 कोटींचा व्यवहार

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

टाटा ग्रुपने बंगळूरमध्ये 2,300 कोटी रुपयांच्या विक्रमी व्यवहाराने रिअल इस्टेट मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. हिंदुजा ग्रुपकडून 38 एकर जमीन खरेदी करून, टाटा आता तिथे आशियातील सर्वात आधुनिक ऑफिस हब उभारण्याची तयारी करत आहे.

Advertisement

टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बंगळूरच्या रिअल इस्टेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार पूर्ण केला. टाटाने हिंदुजा ग्रुपच्या कंपन्या, गल्फ ऑइल कॉर्प आणि हिंदुजा रियल्टी व्हेंचर्स यांच्यासोबत खरेदीकरार केला आहे.

जागतिक दिग्गजांना धक्का

व्यवहारातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे, विश्वात सर्वात मोठी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोनदेखील या भू-स्पर्धेत सहभागी होती. टाटा रियल्टीने सिद्ध केले की भारतीय संस्थात्मक विकासक आता मोठ्या मालमत्तांसाठी जागतिक गुंतवणूकदारांना कडवी टक्कर देत आहेत.

Advertisement
Tags :

.