For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा समूहाची गुजरातमध्ये विस्ताराची योजना

07:00 AM Mar 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
टाटा समूहाची गुजरातमध्ये विस्ताराची योजना
Advertisement

वृत्तसंस्था/अहमदाबाद

Advertisement

टाटा समूहाने गुजरात सरकारकडे सेमी कंडक्टर चीप निर्मितीसाठी 80 एकर जागेची मागणी केली आहे. सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पाच्या विस्तारासाठी सदरची जमीन लागणार असल्याचे टाटा समूहाने म्हटले आहे. कंपनीकडे सध्याला 20 एकर इतकी जमीन ताब्यात आहे, जिथे समूहाचा चीप फॅब्रिकेशनचा प्लांट स्थित आहे. टाटा सुमूहातील सहकारी कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अतिरिक्त जमिनीवरती प्रकल्पाचा विस्तार करणार असून या ठिकाणी 3000 ते 3500 कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी सुविधाही देणार असल्याचे समजते.

3 हजार कर्मचाऱ्यांना घरे

Advertisement

चिप फॅब्रिकेशन युनिटला कच्चा माल पुरवठा करणाऱ्या जवळपास 3 हजार कर्मचाऱ्यांसाठी स्टुडिओ अपार्टमेंटरुपी घरे बांधली जाणार आहेत. कालांतराने त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे तसेच मनोरंजन केंद्र आणि डायनिंगची सुविधा देखील तेथे करण्याची कंपनीची तयारी आहे.

कोठे होतोय कारखाना

गुजरातमधील ढोलेरा येथे कंपनीचा सेमीकंडक्टर चीप फॅब्रिकेशनचा कारखाना होत आहे. ढोलेरामध्ये होणारा कंपनीचा फॅब्रिकेशन कारखाना 91 हजार कोटी रुपये खर्चातून होणार आहे.

Advertisement
Tags :

.