टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा भारत इलेक्ट्रॉनिक्ससोबत करार
07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत एक करार केला आहे. या करारांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर पर्यायावर विकासाचे कार्य एकत्रित करण्यावर दोन्ही कंपन्यांमध्ये सहमती झाली आहे. दोन्ही कंपन्यांनी सहकार्याचा करार केला असून त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सेमीकंडक्टरच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या सरकारच्या आवाहनानुसार टाटा इलेक्ट्रॉनिक्सने नुकताच नवा करार केला आहे. देशांतर्गत मागणीचा विचार करुन ती पूर्ण करण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्रित काम करणार आहेत.
Advertisement
Advertisement