For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा कंझ्युमरचा नफा 65 टक्क्यांनी वाढला

06:31 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
टाटा कंझ्युमरचा  नफा 65 टक्क्यांनी वाढला
Advertisement

आर्थिक वर्ष 2025 च्या तिमाहीमधील कामगिरी

Advertisement

मुंबई :

आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीत टाटा कंझ्युमर 65 टक्क्यांनी नफ्यात राहिली आहे. तिमाहीत एकूण उत्पन्न 4,665 कोटी रुपये होते. हे गेल्या वर्षीपेक्षा 17.65 टक्के जास्त आहे. कंपनीचा ऑपरेशन्समधून महसूल 4,608 कोटी रुपये होता. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 4,180 कोटी रुपये होता आणि एकूण कर 123 कोटी रुपये होता.

Advertisement

एकूण उत्पन्नातून खर्च आणि कर वजा करून, कंपनीने चौथ्या तिमाहीत 349 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. हा गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच, महसुलासोबत कंपनीचा नफाही वाढला आहे.

सामान्यांसाठी काय राहतो निकाल

जर तुमच्याकडे टाटा कंझ्युमरचे समभाग असतील, तर कंपनीच्या संचालक मंडळाने समभागधारकांना प्रति समभाग 8.25 रुपये लाभांश मंजूर केला आहे.

कंपनीचे निकाल अपेक्षित आहेत का?

बाजार विश्लेषकांना 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत टाटा कंझ्युमर 311 कोटी रुपयांचा नफा नोंदवेल अशी अपेक्षा होती. यानुसार, कंपनीने बाजार विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

Advertisement
Tags :

.