महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टाटा कंझ्युमरचे बाजारमूल्य 1 लाख कोटींच्या घरात

06:37 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड ही टाटा समूहाची 1 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी 7वी कंपनी ठरली आहे.  शुक्रवारी (डिसेंबर 29), टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे शेअर्स 3.76 टक्क्यांच्या वाढीसह 1,080.15 रुपयांवर व्यवहार करत आहेत. व्यापारादरम्यान, कंपनीच्या समभागांनी 1,082 रुपयांचा सर्वकालीन उच्च आणि 52 आठवड्यांचा उच्चांक देखील बनवला.

Advertisement

यासह टाटा कंझ्युमरचे मार्केट कॅप प्रथमच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. काही दिवसांपूर्वी टाटा पॉवर 1-लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह टाटा समूहाची 6वी  कंपनी बनली. टाटा कंझ्युमर आणि टाटा पॉवर व्यतिरिक्त  1 लाख कोटी रुपयांचा बाजार भांडवलाचा टप्पा गाठणाऱ्यात टाटा ग्रुपच्या ट्रेंट लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांचादेखील समावेश आहे.

 टाटा कंझ्युमरचा यावर्षी 39 टक्के परतावा

टाटा कंझ्युमरच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांत 25.45 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर गेल्या एका महिन्यात त्यात सुमारे 15.69 टक्के वाढ झाली आहे. टाटा कंझ्युमरने 2023 मध्ये 41.68टक्के परतावा दिला आहे. गेल्या 12 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 39.16 टक्के वाढ झाली आहे.

रिलायन्स अव्वल

बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील टॉप कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल आहे. त्यांचे बाजार भांडवल मूल्य 17.48 लाख कोटी रुपये आहे. टीसीएस 13.75 लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर, एचडीएफसी बँक 12.97 लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आयसीआयसीआय बँक 6.99 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह चौथ्या स्थानावर आहे आणि इन्फोसिस 6.40 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह 5व्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article