For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा कॅपिटलचा आयपीओ 6 ऑक्टोबरला होणार खुला

06:17 AM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
टाटा कॅपिटलचा आयपीओ 6 ऑक्टोबरला होणार खुला
Advertisement

17 हजार कोटी उभारण्याची तयारी : कंपनीची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बहुप्रतिक्षीत टाटा समूहातील टाटा कॅपिटल कंपनीचा आयपीओ अखेर 6 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. कंपनीने यासंदर्भातील माहिती शेअर बाजाराला दिली. टाटा कॅपिटल सदरच्या आयपीओतून 17 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभी करणार असल्याचे सांगितले जाते. संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा अँकर गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये 3 ऑक्टोबर रोजी गुंतवणूक करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement

या आयपीओअंतर्गत कंपनी 21 कोटी ताजे समभाग शेअरबाजारात विक्री करता उपलब्ध करणार आहेत. रिटेल गुंतवणुकदारांसाठी 6 ऑक्टोबर रोजी आयपीओ खुला होईल.  टाटा कॅपिटलने आयपीओकरिता 317 ते 326 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित केली आहे. 50 टक्के संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी आयपीओ राखीव असणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी कंपनीचे समभाग बाजारात सूचीबद्ध होतील.

Advertisement
Tags :

.