टाटा कॅपिटलचा आयपीओ सप्टेंबर अखेर
17,200 कोटी रुपये उभारणीचे ध्येय : कंपनीचे मूल्य 1.59 लाख कोटी राहण्याची शक्यता
मुंबई : टाटा समूहाची वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटल आपला आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचा आयपीओ सप्टेंबरच्या अखेरीस येऊ शकतो. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी सुमारे 17,200 कोटी रुपये उभारू शकते. जर तसे झाले तर हा 2025 मधील सर्वात मोठा इश्यू राहणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. कंपनीने आयपीओमधून 1.59 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन प्राप्त करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. कंपनीने आयपीओसाठी 4 ऑगस्ट रोजी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे ड्राफ्ट पेपर्स म्हणजेच अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केले होते. कंपनी आयपीओमध्ये एकूण 47.58 कोटी शेअर्स विकणार आहे
कंपनीचे गोपनीय प्री-फायलिंग
कंपनीने 5 महिन्यांपूर्वी आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या आयपीओसाठी सेबीकडे हे प्री-फायलिंग गोपनीय होते.