For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा कॅपिटलच्या आयपीओला मंजुरी

06:17 AM Feb 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
टाटा कॅपिटलच्या आयपीओला मंजुरी
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

टाटा समुहातील वित्त कंपनी टाटा कॅपिटल यांचा आयपीओ सादरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. संचालक मंडळाने टाटा कॅपिटलच्या आयपीओ सादरीकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. याअंतर्गत कंपनी 23 कोटी नवे समभाग जारी करणार आहे. सध्याच्या समभागधारकांकडून ऑफर फॉर सेलअंतर्गतही 1504 कोटी रुपयांचे समभाग जारी केले जाणार आहेत. 2023 मध्ये टाटा टेक्नॉलॉजीज यांचा समभाग बाजारात लिस्ट झाल्यानंतर टाटा समूहाचा हा समभाग सुचीबद्ध होणार आहे.

टाटा कॅपिटल आयपीओअंतर्गत एकंदर 15 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना बनवत असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार सदरचा कंपनीचा आयपीओ येत्या सप्टेंबरमध्ये बाजारात लाँच केला जाणार आहे. बिगर बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या टाटा कॅपिटलमध्ये टाटा सन्स यांची जवळपास 92 टक्के इतकी हिस्सेदारी ओह. पर्सनल लोन, होम लोन, ऑटो लोन, व्यावसायिक वाहनांसाठी लोन व व्यवसायासाठी कर्ज देणारी ही कंपनी आहे. याशिवाय कंपनी क्रेडिट कार्ड व डिजिटल लोनही देते.

Advertisement

समभाग तेजीत

टाटा इन्वेस्टमेंटचे समभाग शेअरबाजारात तेजीत असताना दिसले. समभाग 7 टक्के इतके वधारले होते. यायोगे समभागाचा भाव 6225 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या वर्षभरात पाहता या समभागात 12 टक्के इतकी घसरण झाली आहे.

Advertisement
Tags :

.