For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा कॅपिटलकडून आयपीओची जय्यत तयारी

06:17 AM Apr 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
टाटा कॅपिटलकडून आयपीओची जय्यत तयारी
Advertisement

15 हजार कोटी उभारणार : सेबीकडे कागदपत्रे सुपूर्द

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

टाटा समूहातील वित्त सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या टाटा कॅपिटलने सार्वजनिक प्रारंभिक प्रस्तावासाठी म्हणजेच आयपीओ करिता आवश्यक कागदपत्रे बाजारातील नियामक सेबीकडे सुपूर्द केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरच्या आयपीओ आणण्याच्या प्रक्रियेला आता कंपनीने खऱ्या अर्थाने गती देण्यास सुरुवात केली आहे. आयपीओ कधी आणला जातो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आता लागून राहिले आहे.

Advertisement

या आयपीओच्या माध्यमातून टाटा कॅपिटल 15000 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. आयपीओमार्फत कंपनीने 2.3 कोटी नवे समभाग जारी करण्याचाही विचार चालवला आहे. याशिवाय सध्याचे समभागधारक यांच्यामार्फत ऑफर फॉर सेल अंतर्गत समभाग सादर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाटा सन्स कंपनीची टाटा कॅपिटलमध्ये 92 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरीत हिस्सेदारी टाटा समूहातील इतर कंपन्यांकडे आणि ट्रस्टपाशी आहे. रिझर्व बँकेकडून टाटा कॅपिटलला बिगर बँकिंग वित्त कंपनी म्हणून दर्जा मिळाला आहे.

10 बँकांची निवड

आयपीओ करिता कंपनीने दहा गुंतवणूक बँकांची निवड केली आहे. यामध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी, जेपी मॉर्गन, अॅक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सेक्युरिटीज, एचएसबीसी सेक्युरिटीज, आयआयएफएल कॅपिटल, बीएनपी पारिबास, एसबीआय कॅपिटल आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे.  सेबीकडे कागदपत्रे दाखल करत कंपनीने कार्याला वेग दिलाय.

Advertisement
Tags :

.