For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा-एअरटेल डीटीएच विलीनीकरण चर्चेमध्येच

06:51 AM Feb 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
टाटा एअरटेल डीटीएच विलीनीकरण चर्चेमध्येच
Advertisement

एअरटेलकडे 50 टक्केपेक्षा जास्त हिस्सेदारी : ग्राहकांची संख्या 3.5 कोटींवर राहण्याचे संकेत

Advertisement

नवी दिल्ली :

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने एअरटेल आपला डीटीएच व्यवसाय टाटा प्लेमध्ये विलीन करणार असल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. एअरटेलने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, हा करार चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहे. सदरच्या अहवालात म्हटले आहे की, जर हे विलीनीकरण झाले तर 2016 मध्ये डिश टीव्हीचे व्हिडिओकॉन डी2एचसोबत विलीनीकरण झाले होते, त्यानंतर हे भारतातील डीटीएच क्षेत्रातील सर्वात मोठे विलीनीकरण ठरणार आहे. हे विलीनीकरण समभागांच्या स्वॅपद्वारे पार पडणार आहे. एअरटेलकडे 52-55 टक्के इतकी हिस्सेदारी राहणार आहे.

Advertisement

विलीनीकरण का होत आहे?

टाटा प्ले आणि एअरटेलच्या डिजिटल टीव्हीचे विलीनीकरण करण्याचा निर्णय अशा वेळी आला आहे. जेव्हा लोक टीव्हीऐवजी ऑनलाइन व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग पाहणे पसंत करतात. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मते, डीटीएच वापरकर्त्यांची संख्या आर्थिक वर्ष 2021 मध्ये 7 कोटींवरून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6 कोटींवर घसरली आहे. विलीनीकरणानंतर, एअरटेल डिजिटल टीव्हीला टाटा प्लेच्या 1.9 कोटी घरांमध्ये आणि 50 लाख ब्रॉडबँड ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. सध्या, त्यांच्या एकत्रित ग्राहकांची संख्या 3.5 कोटी आहे. विलीनीकरणानंतर, एकत्रित कंपनीकडे टेलिकॉम ब्रॉडबँड आणि डीटीएच एकत्रित करून अधिक सेवा देण्याची क्षमता असेल.

टाटा प्लेची सुरुवात संयुक्त उपक्रमातून

टाटा प्लेची सुरुवात 2006 मध्ये रूपर्ट मर्डोकच्या न्यूज कॉर्पसोबत संयुक्त उपक्रम म्हणून करण्यात आली. पूर्वी त्याचे नाव टाटा स्काय होते. 2019 मध्ये, जेव्हा वॉल्ट डिस्ने कंपनीने मर्डोकचे 21 व्या शतकातील फॉक्स विकत घेतले, तेव्हा ही हिस्सेदारी त्यांच्याकडे गेली.

टीव्ही सेवा 2008 मध्ये सुरू

भारती एअरटेल लिमिटेडने 2008 मध्ये डायरेक्ट टू होम (डीटीएच) उपग्रह टीव्ही सेवा ‘एअरटेल डिजिटल

टीव्ही’ सुरू केली. सुरुवातीला ही सेवा

62 शहरांमधील 21,000 रिटेल आउटलेटद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली.

Advertisement
Tags :

.