For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत टास्क फोर्स

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत टास्क फोर्स
Advertisement

नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार : नियम मोडण्यास आर्थिक दंड

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

राजधानीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, ग्रिड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (जीआयएपी-4 किंवा ग्राप-4) राबविण्यात येत आहे. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी ग्राप-4 अंतर्गत 6 सदस्यीय विशेष कृती दल (टास्क फोर्स) तयार करण्यात आले आहे. या टास्क फोर्सचे नेतृत्व पर्यावरण विभागाचे विशेष सचिव करणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना या कृती दलाकडून दंड आकारणी केली जाणार आहे. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल रॉय यांनी प्रदूषणाबाबत गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी टास्क फोर्स स्थापन केल्यासंबंधीची माहिती दिली. सध्या पर्यावरण विभागाचे विशेष सचिव स्पेशल टास्क फोर्सचे नेतृत्त्व करणार आहेत. तसेच विशेष परिवहन आयुक्त, डीसीपी वाहतूक (मुख्यालय), डीसी महसूल (मुख्यालय), मुख्य अभियंता एमसीडी आणि मुख्य अभियंता पीडब्ल्यूडी हे इतर पाच सदस्य असतील.

Advertisement

3 नोव्हेंबरपासून आतापर्यंत राजधानीत प्रदूषण करणाऱ्या 19 हजारांहून अधिक वाहनांना नोटीस आल्याची माहिती देण्यात आली. 3 ते 15 नोव्हेंबर दरम्यान 754 ओव्हरलोड वाहनांना दंडात्मक नोटीस दिली. तसेच सीमेवरूनच 6046 ट्रक परत पाठवण्यात आले. तर दिल्ली क्षेत्रात घुसलेल्या 1,316 ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून 20,000 ऊपये चलन वसूल करण्यात आले. वाहनांच्या प्रदूषण तपासणीअंतर्गत 3 नोव्हेंबरपासून 19,227 चलन जारी करण्यात आली आहेत. वाहनांसोबतच राजधानीत बांधकाम व्यवसायासंबंधीच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी 581 टीम कार्यरत आहेत. याअंतर्गत 1.85 कोटी ऊपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.