For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : तासगाव पं. स. च्या 12 गणांसाठी आज आरक्षण

04:33 PM Oct 13, 2025 IST | NEETA POTDAR
sangli   तासगाव पं  स  च्या 12 गणांसाठी आज आरक्षण
Advertisement

                      तासगावात  आरक्षण सोडतीची सर्व तयारी पूर्ण

Advertisement

तासगाव : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने तासगांव पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत होत आहे. तालुक्यातील बारा गणाचे आरक्षण यावेळी निश्चित करण्यात येणार असून आरक्षण सोडतीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती तहसिलदार अतुल पाटोळे यांनी दिली.

तासगाव तालुक्यात यापूर्वी जि. . व पं.. निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे चार जि. . सदस्य व भाजपचे दोन सदस्य असे सहा सदस्य तसेच पंचायत समितीसाठी राष्ट्रवादीचे सात सदस्य व भाजपचे पाच सदस्य असे बारा सदस्य निवडून आले होते. १४ मार्च २०२२ रोजी या सर्वांची मुदत संपली.

Advertisement

त्यानंतर सर्वांच्या नजरा आगामी निवडणूक प्रक्रियेकडे होत्या. शुक्रवारी १० ऑक्टोंबर रोजी पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिले. तर सोमवारी १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी तासगांवातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील बहुउद्देशीय कक्ष येथे पंचायत समिती गणांची आरक्षण 99 वाजता सोडत होणार आहे.

उत्तम प्रांताधिकारी दिघे व तहसिलदार अतुल पाटोळे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत प्रक्रिया होणार आहे. तालुक्यातील मांजर्डे, पेड, सावळज, वायफळे, चिंचणी कुमठे, विसापूर, बोरगांव, येळावी, वासुंबे, मणेराजुरी, सावर्डे या गणांचे आरक्षण होणार आहे. यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमातील व नागरिकांचा मागास प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसिलदार अतुल पाटोळे यांनी दिली.

Advertisement
Tags :

.