For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : मोटारसायकल चोरी प्रकरणात तासगाव पोलिसांना मोठे यश; दोन सराईत चोरटे जेरबंद

02:59 PM Dec 10, 2025 IST | NEETA POTDAR
sangli crime   मोटारसायकल चोरी प्रकरणात तासगाव पोलिसांना मोठे यश  दोन सराईत चोरटे जेरबंद
Advertisement

                        तासगाव पोलिसांचा धडक कारवाई

Advertisement

तासगाव : तासगाव शहर व परिसरातील वाढत्या मोटारसायकल चोरी प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तासगाव पोलिसांनी राबवलेल्या विशेष पेट्रोलिंग दरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची किंमत १ लाख ९० हजार रुपये आहे., अशी माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली.

पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित परीट, अमर सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, सुरज जगदाळे, बजरंग थोरात, अभिजीत पाटील, या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी रोहित संजय जावळे (वय २३) व सुखलाल उर्फ नांज्या गुंडु शिंदे (वय २२, दोन्ही रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव यांना अटक करण्यातआली आहे.

Advertisement

पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील निमणी येथील महेश शितल कोळी यांनी २४ नोव्हेंबर रोजी तासगावमधील सांगली नाका येथून मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल केली होती. याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.२७ वा. पो. हे. कॉ. अमर सुर्यवंशी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की काशिपूरा इंदिरानगर रोडवरील स्मशानभूमीजवळ दोन इसम चोरीच्या मोटारसायकलींसह थांबले आहेत.

माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडील गाड्यांची कागदपत्रे विचारता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तपासात त्या मोटारसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या गाड्यांची किंमत १ लाख ९० इतकी आहे. सर्व गाड्यांवरील आर टी ओ नंबर काढून टाकण्यात आले होते. त्यांच्याकडून तासगाव, पलूस, कवठेमंकाळ, सांगली शहर अशा ठिकाणचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.