महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्रात बदल घडवायचा! सावळज येथे खा.सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

04:30 PM Sep 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
Tasgaon- Kavthe Mahankal Rohit Patil
Advertisement

मविआ सरकार सत्तेवर येणार - आम जयंत पाटील : रोहित पाटीलच आमदार बनणार असल्याचा खा. विशाल पाटीलांचा दावा

सावळज वार्ताहर

महाराष्ट्रात गा†लच्छ राजकारण पाहायला मिळत आहे, पक्षाचे नाव व चिन्ह गेले तरी आम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता संघर्ष व सत्याचा मार्ग निवडला. त्यामुळे जनता हिच आमची ताकद आहे. सत्ताधारी पवित्र नात्यावरून श्रेयवादाचं राजकारण करीत आहेत. मात्र या धनशक्तीच्या वरोधात सत्य विजयी होणार असल्याने महाराष्ट्रात बदल घडवायचा आहे, असे आवाहन शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी सावळज येथे केले.

Advertisement

सावळज येथील श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व श्री सिध्देश्वर विकास सोसायटीच्या प्रांगणात माजी सभापती, माजी जि. प. सदस्य स्व. चंद्रकांत बापु पाटील यांचा अर्धपुतळा उभारला आहे. याचे अनावरण खा. सुळे व प्रदेशाध्यक्ष आम. जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. या सोहळ्यात खा. सुळे बोलत होत्या. या प्रसंगी खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, युवानेते रा†हत पाटील, सुरेश पाटील, आ†नता सगरे, सागर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी सुळे म्हणाल्या, नेतृत्व हे संघर्षातून उभे राहते, त्यामुळे शुभकार्याची सुरूवात तुतारीने होणार आहे. जनतेची ताकद सोबत असल्यानेच सत्यासाठीची लढाई लढत आहे. तळागाळातील जनतेमुळे दबावाचा विरोध करीत पक्षाचे खासदार निवडून आले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरच देश चालला पाहिजे असे सांगून आमच्या मतदारसंघात विकासकामांसाठी लागणारा निधीला सरकारकडून कात्री लावली जात आहे, असा आरोप केला.

यावेळी जयंत पाटील यांनी येत्या दोन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचे सांगून मविआ सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच विरोधकांचा दबाव झुगारून एकनिष्ठेने पवार साहेबांच्या पाठीशी आबा कुटुंबीय खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे रोहित पाटील विजयी होणाऱ्या आमदारांमध्ये मोजले जात आहेत. पक्षात तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे येण्रायांचे स्वागतच करू. वारं बदललं आहे. सरकार बदलाची भावना जनतेमधून निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी इव्हेंट्स कऊन पुन्हा सत्तेच्या डावात येण्यासाठी धडपडत आहे.

तासगाव- कवठेमहांकाळचे रोहित पाटीलच आमदार होणार- खा. विशाल पाटील
स्व. चंद्रकांत पाटील यांच्या कार्याला उजाळा देत खासदार विशाल पाटील यांनी रोहित पाटील यांना आमदार बनण्यासाठी वसंतदादांचे कुटुंब व विचारांचे कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले. तसेच मी खासदार म्हणून निवडून येण्यास तासगाव कवठेमहांकाळच्या जनतेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे रोहित तुम्ही काळजी करू नका, राजकारण चालतचं राहणार, काही गोष्टी होत राहणार, असं सांगून घोरपडे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न खा. पाटील यांनी केला. तसेच शरद पवार यांच्या इच्छेनुसार राोहित पाटील यांना आमदार बनण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची आहे असे आवाहन खा. पाटील यांनी केले.
रोहित पाटील यांनी आर आर आबांच्या राजकीय वाटचालीत स्व. चंद्रकांत पाटील यांचे असलेले योगदान स्पष्ट करीत अशा निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर येणाऱ्या निवडणुकीत मविआचा पहिला आमदार तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातून होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी जि. प. सदस्य सागर पाटील यांनी प्रास्ताविक केले तर प्रदेश सरचिटणीस ताजिद्दिन तांबोळी यांनी आभार मानले.
याप्रसंगी तासगाव तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, बी. एस पाटील, कमल पाटील, शंकरदादा पाटील, हणमंतराव देसाई, सतीश पवार, अंकुश पाटील, अर्जुन पाटील, युवराज पाटील, राम जाधव, माधवराव पोळ, सरपंच मिनल पाटील, उपसरपंच रमेश कांबळे यांच्यासह पतसंस्था व सोसायटीचे पदा†धकारी, सदस्य, तसेच पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

 

Advertisement
Tags :
MP Vishal PatilRohit PatilTasgaon- Kavthe Mahankal
Next Article