For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुण तेजपाल यांना मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत ठरवले दोषी, दुपारी शिक्षा सुनावली जाणार

11:28 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
तरुण तेजपाल यांना मोठा धक्का  मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत ठरवले दोषी  दुपारी शिक्षा सुनावली जाणार
Advertisement

पणजी : 'तेहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात गोवा सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेला निर्दोष मुक्ततेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करत तेजपाल यांना दोषी ठरवले आहे. त्यांच्या शिक्षेबाबतचा निर्णय दुपारी २.३० वाजता जाहीर केला जाणार आहे.

Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांदेकर यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने गोवा सरकारने दाखल केलेले अपील मंजूर करत गोवा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला.

नेमके काय आहे प्रकरण?

Advertisement

नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान एका आलिशान हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर त्यांच्याविरोधात बलात्कारासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात गोवा सत्र न्यायालयाने मे २०२१ मध्ये पुराव्यांबाबत संशयाचा फायदा देत तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्या निर्णयाविरोधात गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपीलावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत तेजपाल यांना दोषी ठरवले आहे. आता त्यांना दुपारी २.३० वाजता शिक्षा सुनावली होणार आहे.

Advertisement
Tags :

.