तरुण गर्ग ह्युंडाईच्या एमडी, सीईओपदी
प्रथमच एका भारतीयाच्या हाती कंपनीची धुरा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ह्युंडाई मोटर इंडियाचे एमडी आणि सीईओ तरुण गर्ग यांनी युनसू किम यांची जागा घेतली आहे, जे आता दक्षिण कोरियास्थित ह्युंडाई मोटर कंपनी (एचएमसी) मध्ये धोरणात्मक भूमिका बजावतील. तरुण गर्ग यांनी 1 जानेवारी 2026 पासून ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी आणि सीईओ) म्हणून पदभार स्वीकारला आहे. एचएमआयएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय नागरिकाला कंपनीची धुरा देण्यात आली आहे. कंपनीच्या स्थापनेला 29 वर्षे झाली आहेत. तरुण गर्ग यांनी युनसू किम यांची जागा घेतली आहे, जो आता दक्षिण कोरियास्थित ह्युंडाई मोटर कंपनीमध्ये धोरणात्मक भूमिका बजावेल. कंपनीने म्हटले आहे की हा बदल भारताचे वाढते महत्त्व आणि भारतीय नेतृत्वावरील विश्वास दर्शवितो.
तीन दशकांहून अधिकचा अनुभव
तीन दशकांहून अधिक ऑटोमोबाईल क्षेत्राचा अनुभव असलेले तरुण गर्ग भारतात ह्युंडाईच्या पुढील वाढीच्या टप्प्याचे नेतृत्व करतील. ह्युंडाई मोटर इंडियाच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की तरुण गर्ग यांचे नेतृत्व चार मुख्य स्तंभांवर आधारित असेल.
पहिला-लोक आणि बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणे,
दुसरा- ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवणे,
तिसरा- नवीन तंत्रज्ञान आणि नवोपक्रम
चौथा- ‘मेक इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड’ला प्रोत्साहन देणे.