For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तरुण भारत’ची ‘घुमट गाज’ स्पर्धा 10, 11 सप्टेंबर रोजी

06:26 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘तरुण भारत’ची ‘घुमट गाज’ स्पर्धा 10  11 सप्टेंबर रोजी
Advertisement

अखिल गोवा उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन गटांसाठी मर्यादित : तरुण भारत व श्रीनिवास सिन्नाई धेंपो महाविद्यालय यांचा उपक्रम

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पणजी :  गोव्याच्या पारंपरिक घुमट आरती परंपरेला महाविद्यालयीन स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी दैनिक तरुण भारत आणि धेंपो चॅरिटीज ट्रस्टच्या श्रीनिवास सिन्नाई धेंपो महाविद्यालय (स्वायत्त), कुजिरा-बांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घुमट गाज’ अखिल गोवा उच्च माध्यमिक व आंतरमहाविद्यालयीन अशा दोन गटांत घुमट आरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद व इंडिक क्लबच्या सहकार्याने ही स्पर्धा अनुक्रमे गुऊवार दि.10 सप्टेंबर व शुक्रवार दि.11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वा. महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात होणार आहे.

Advertisement

गोव्यातील गणेशोत्सवात सादर होणारी घुमट आरती ही संगीत, भक्तिरस आणि तालाचा सुंदर संगम आहे. घुमट, कसाळे, शमेळ व गायक या घटकांच्या माध्यमातून पारंपरिक शैलीत सादर होणारी ही कला नव्या पिढीत ऊजविणे, स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देणे आणि या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही स्पर्धा गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात व महाविद्यालयीन युवकांमध्ये उत्साह व नवचैतन्य आणणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

स्पर्धा फक्त गोव्यातील उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन संघांसाठी खुली आहे. सादरीकरणाची वेळ कमाल 10 मिनिटे असेल. पारंपरिक वेशभूषा बंधनकारक असून कृत्रिम किंवा रेकॉर्डेड संगीत वापरण्यास सक्त मनाई आहे. दोन्ही गटातील इच्छुक संघांनी स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित करण्यासाठी प्रा. आनंद नाईक पानवेलकर (मोबाईल क्रमांक - 9422453224) यांच्याशी संपर्क साधावा.

उच्च माध्यमिक गटातील बक्षिसे

प्रथम क्रमांक विजेत्यास 10,000 रुपये रोख व ट्रॉफी

द्वितीय क्रमांकास 7,000 रुपये रोख व ट्रॉफी

तृतीय क्रमांकास 5,000 रुपये रोख व ट्रॉफी

उत्तेजनार्थ पहिल्या क्रमांकासाठी 2,000 रुपये

दुसऱ्या क्रमांकासाठी 1,000 रुपये रोख

उत्कृष्ट घुमटवादक, कसाळेवादक, शमेळवादक, गायक यांना प्रत्येकी 500 ऊपये रोख व ट्रॉफी.

महाविद्यालयीन गटातील बक्षिसे

प्रथम क्रमांक विजेत्यास 15,000 रुपये रोख व ट्रॉफी

द्वितीय क्रमांकास 10,000 रुपये रोख व ट्रॉफी

तृतीय क्रमांकास 7,000 रुपये रोख व ट्रॉफी

उत्तेजनार्थ पहिल्या क्रमांकासाठी 3,000 रुपये

दुसऱ्या क्रमांकासाठी 2,000 रुपये

उत्कृष्ट घुमटवादक, कसाळेवादक, शमेळवादक व गायक यांना प्रत्येकी 1,000 ऊपये रोख व ट्रॉफी.

Advertisement
Tags :

.