For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाळाच्या मृत्यूच्या नैराश्यातून मातेची गळफासाने आत्महत्या

06:16 PM Feb 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
बाळाच्या मृत्यूच्या नैराश्यातून मातेची गळफासाने आत्महत्या
Advertisement

सावंतवाडी -
माजगाव गरड येथे भाड्याने राहणाऱ्या (21) वर्षीय नवविवाहितेने खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. सौ. प्रीती प्रल्हाद केतकर, पूर्वाश्रमाची तनुजा मनोहर बागडी, मूळ राहणार (दुंडगे, चंदगड जिल्हा कोल्हापूर )असे मयत नवविवाहितेचे नाव आहे. या घटनेची फिर्याद नारायण विठोबा बागडी (35) नागझर मोपा ,पेडणे गोवा यांनी पोलीस ठाण्यात दिल्यावरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.भाड्याने राहणाऱ्या घरात सौ.प्रीती केतकर ही एकटी असल्याने स्वतःच्या ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सात वाजता उघडकीस आला. मयत हिचे नातेवाईक नारायण बागडी यांनी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की सौ.प्रीती प्रल्हाद केतकर पूर्वाश्रमीची तनुजा मनोहर बागडी हिचे एप्रिल 2025 रोजी विवाह झाला होता. ऑक्टोबर 2025 मध्ये तिचे तीन महिन्याचे बाळ निमोनिया आजाराने मयत झाले होते.या धक्क्याने प्रीती केतकर ही निराश होती.या नैराश्येतून घरात कोणीही नसताना स्वतःच्या ओढणीचे सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहा निरीक्षक पंकज शिंदे जयेश खंदरकर महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक आदींची टीम घटनास्थळी जात भेट दिली मयत प्रीती केतकर ही नवाविवाहित असल्याने तिचे माहेरचे नातेवाईक चंदगड येथून आल्या नंतर शासकीय पंचासमक्ष शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.तीन महिन्याचे तिचे बाळ आजाराने मयत झाल्याने त्या धक्क्याने निराश होऊन तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज असला तरी या घटनेचा पूर्ण सखोल तपास व चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.