For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजेच्या लपंडावाने संतप्त आचरावासियांची वीज वितरणवर धडक

10:53 AM Oct 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
विजेच्या लपंडावाने संतप्त आचरावासियांची वीज वितरणवर धडक
Advertisement

नुकसान भरपाई द्या; अन्यथा बिले भरणार नाही, व्यापाऱ्यांनी घेतली भूमिका

Advertisement

आचरा प्रतिनिधी

ऐन भाऊबीजेलाच गुल झालेल्या विजेचा लपंडाव संपता संपत नसल्याने संतप्त आचरावासिय आणि व्यापारी वर्गाने शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी आचरा सबस्टेशन वीज वितरण कार्यालयावर धडक देत उपस्थित सहाय्यक वीज अभियंता सौरभ वर्मा यांना धारेवर धरले.यावेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी विद्युत मंडळाने कारभार न सुधारल्यास कार्यालयास टाळे ठोकण्यास मागेपुढे बघणार नाही. पोलीसांनी गुन्हे दाखल केले तरी चालतील असा इशारा दिला. यावेळी गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी समस्या निवारणासाठी वीज वितरणच्या वरीष्ठ अधिका-यांना आचरा बाजारपेठ येथील कार्यालयात पाचारण करून बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.ऐन दिवाळीच्या सणात विजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे ग्रामस्थ , व्यापारी यांना मनस्ताप सहन करावा लागला होता.मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे मंदिचा फटका बसलेल्या व्यापारी वर्गाला ऐन दिवाळी सणातच सुरू झालेल्या लाईटच्या लपंडावामुळे मोठा फटका सहन करावा लागला.हाॅटेल , इलेक्ट्रॉनिक्स, ऑनलाईन कामकरणारे यांंना मोठे नुकसान सहन करावे लागले.मध्येमध्ये ये जा करणारी लाईट शुक्रवार रात्री पासूनच गायब झाली होती. शनिवारी सकाळी पण लाईट न आल्याने संतप्त व्यापारी, ग्रामस्थ यांनी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या समवेत आचरा टेंबली येथील विजवितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, जयप्रकाश परुळेकर, अभिजित सावंत, अभय भोसले, डॉ प्रमोद कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडी यांसह सिद्धार्थ कोळगे,विजय कदम,बाबू धुरी, विकास कावले,खोत, सचिन सारंग गोसावी यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते. आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास टेंबूलकर, मिनाक्षी देसाई,मनोज पुजारे आदी आंदोलन स्थळी उपस्थित झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.