For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुधवळेत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

05:13 PM May 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
बुधवळेत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद
Advertisement

मालवण : प्रतिनिधी

Advertisement

तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग अधिकारी जलद बचाव पथक व ग्रामस्थांनी सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.ही घटना रविवार ३ मे रोजी घडली . स्थानिक ग्रामस्थ राजू मुणगेकर आणि संदिप बुधवळेकर यांनी बुधवळे मळेशेत मधील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची पडल्याची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अथक प्रयत्नातून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले . पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर बिबट्याची तपासणी केल्यानंतर बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सदरची बचाव मोहीम उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश शर्मा, साहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल श्री.संदीप कुंभार, मालवण वनपाल सदानंद परब , धामापूर वनरक्षक अतुल खोत,वाहन चालक राहुल मयेकर ,RRT टीम सदस्य अनिल गावडे,दिवाकर बांबरर्डेकर,सुशांत करंगुटकर,वैभव अमरुस्कर,प्रसाद गावडे, श्री. संदिप परब स्थानिक ग्रामस्थ श्री. राजू मुणगेकर, श्री अनंत शिर्सेकर, श्री.संदिप बुधवळेकर, श्री.समीर टेंबुलकर, श्री.प्रकाश बिडवलेकर, श्री संदिप कुळेकर पोलीस पाटील व बुधवळे ग्रामस्थांच्या सहभागातून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली . दिनांक 03 मे हा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन असून या पार्श्वभूमीवर विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.