For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साहित्यिक संतोष चिलेंना छ. शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर

04:38 PM May 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
साहित्यिक संतोष चिलेंना छ  शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर
Advertisement

१६ मे रोजी बेळगावात होणाऱ्या ९८ व्या राष्ट्रीय संमेलनात वितरण

Advertisement

ओटवणे  : प्रतिनिधी

सर्किट बेंच फाऊंडेशनचा यावर्षीचा 'छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार २०२६' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे गावचे सुपुत्र साहित्यिक संतोष दत्ताराम चिले यांना जाहिर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १६ मे रोजी बेळगाव येथे होणाऱ्या ९८ व्या राष्ट्रीय संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत संतोष चिले यांना हा मानाचा 'छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात येणार आहे.उल्लेखनीय म्हणजे ९८ वे राष्ट्रीय संमेलन आयोजित करणारे 'डॉ. सुरेश डी. एस. राठोड फाऊंडेशन' हे परदेशातील दूतावासामध्ये आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्याचा बहुमान मिळालेले भारतातील पहिले फाऊंडेशन आहे. सर्किट बेंच फाऊंडेशन, शांतीदूत परिवार, इंडियन पोलीस मित्र भारत आणि विशेष कार्यकारी अधिकारी न्याय हक्क जनजागृती फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा '९ डी' (9D Visual Experience) दर्जाचा हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. साहित्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील एक अभिमानास्पद सोहळा आहे . ​संतोष चिले यांनी आपल्या लेखणीतून केवळ शब्दरचनाच केल्या नाहीत, तर त्या शब्दांना कृतीची जोड दिली आहे. त्यांनी अनाथ आश्रम, रस्त्यावरील भिक्षुक आणि मुक्या प्राण्यांची कोणत्याही ​प्रसिद्धीविना केलेली निःस्वार्थ सेवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य पैलू आहे. ​कवी मनाची सामाजिक बांधीलकी असलेले आणि "समाज सेवा हीच खरी उपासना" हे ब्रीद सार्थ ठरवणाऱ्या संतोष चिले यांच्या साहित्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मानाचा 'छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार २०२६'साठी निवड झाल्याबद्दल संतोष चिले यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.