For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाफोलीच्या माऊली पंचायतनचा उद्या 'पंचकुंडी पुन:प्रतिष्ठापना सोहळा'

06:20 PM Apr 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वाफोलीच्या माऊली पंचायतनचा उद्या  पंचकुंडी पुन प्रतिष्ठापना सोहळा
Advertisement

​त. भा. वृत्तसेवा,बांदा

Advertisement

वाफोली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिराचा भव्य 'पंचकुंडी पुन:प्रतिष्ठापना सोहळा' सध्या अत्यंत भक्तीमय वातावरणात सुरू आहे. या सोहळ्याची सांगता शुक्रवार, दिनांक २४ एप्रिल रोजी विविध धार्मिक विधी, प्राणप्रतिष्ठा आणि महाप्रसादाने होणार आहे.शुक्रवार, २४ एप्रिलचे मुख्य कार्यक्रम
​सोहळ्याच्या अंतिम दिवशी सकाळी ७:३० वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने ​सकाळी ७:३० ते १२. ३० मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहित देवता पूजन, तत्वहोम आणि आवाहित मंडल देवतांसाठी हवन.
​मूर्ती प्रतिष्ठापना सकाळी १०:२६ ते ११:११ या शुभ मुहूर्तावर श्री देवी माऊली पंचायतन देवता पुन:प्रतिष्ठापना, तत्त्व न्यास आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल.​दुपारी १२:३० पर्यंत: महापूजा, प्रायश्चित्त होम, बलिदान पूर्णाहुती, अभिषेक, आशीर्वाद आणि महानैवेद्य. दुपारी १२:३० वाजता सोहळ्याची महाआरती होईल. त्यानंतर भाविकांसाठी 'महाप्रसादा'चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमिती वाफोली, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था (मुंबई) व समस्त वाफोली ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.