For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत भूमी अभिलेख कर्मचारी लाच घेताना सापडला

04:30 PM Apr 17, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत भूमी अभिलेख कर्मचारी लाच घेताना सापडला
Advertisement

गुन्हा दाखल

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

सामायिक जमिनीतील पोटहिस्सा मोजणीचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपये लाच घेताना सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (३३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने दोन महिन्यापूर्वी जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता. सदर काम करून देण्यासाठी आपटे याने तक्रादाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता आपटे याने २० हजार रुपयांची मागणी केली आणि तडजोडीअंती १० हजाराची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आपटे याच्यावर भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ संशोधन २०१८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.