वाफोली पंचायतन मंदिरात पंचकुंडी पुन:प्रतिष्ठापना सोहळा
२१ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
त. भा. वृत्तसेवा
बांदा
वाफोली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिराचा भव्य 'पंचकुंडी पुन:प्रतिष्ठापना सोहळा' मंगळवार, दिनांक २१ एप्रिल ते शुक्रवार, दिनांक २४ एप्रिल या कालावधीत अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे. या चार दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक विधी, होमहवन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यानिमित्ताने मंगळवार, २१ एप्रिल रोजी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ७:०० वाजता यजमानांची शरीरशुद्धी व प्रायश्चित्त विधी होईल. त्यानंतर सकाळी ८:०० ते दुपारी १:०० या वेळेत गाऱ्हाणे, प्रधानसंकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, संभारदान, वर्धिनीपुजन, प्राकारशुद्धी, 'गणेशयाग', पंचकुंडी मंडप प्रतिष्ठा आणि श्री देवी माऊली पंचायतन परिवारातील देवांचा जलाधिवास, कौतुकबंधन, आरती व तीर्थप्रसाद असे कार्यक्रम होतील.बुधवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ७:३० ते दुपारी १:०० या वेळेत मंगलाचरण, प्राकारशुद्धी, सर्वमूर्तिना स्थान विधी, ब्रह्मादि मंडल देवता पूजन, मूर्तिचा शय्याधिवास, योगिनी, वास्तू, भैरव, क्षेत्रपाल मंडल देवता पूजन, अरणी मंथापूजन , अग्नी उत्पत्ती , अग्नी स्थापना, ग्रह मंडल देवता पुजन, अन्वाधान, वास्तू, ग्रहयजन, लघुपूर्णाहुती, तीर्थप्रसाद असे विधी पार पडणार आहेत.गुरुवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ७:३० ते दुपारी १:०० या वेळेत मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहित देवता पूजन, अग्नीपुजन, पर्यायहोम, मुख्य देवतासाठी हवन,लघुपूर्णाहुती तीर्थप्रसाद, शुक्रवार, २४ एप्रिल रोजी सोहळ्याच्या सांगता दिनी सकाळी ७:३० ते दुपारी १२:३० मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहीत देवता पूजन, तत्वहोम, आवाहित मंडल देवतांसाठी हवन सकाळी १०:२६ ते ११:११ या शुभ मुहूर्तावर श्री देवी माऊली पंचायतन देवता पुन:प्रतिष्ठापना तत्त्व न्यास, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, प्रायश्चित्त होम, बलिदान पूर्णाहुती,अभिषेक, आशीर्वाद आणि महानैवेद्य होणार आहे. दुपारी १२:३० वाजता सोहळ्याची महा आरती, तीर्थप्रसाद आणि त्यानंतर 'महाप्रसादा'चे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याचे निमंत्रक म्हणून श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमिती वाफोली, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था (मुंबई) व वाफोली ग्रामस्थ यांनी सर्व भाविकांनी या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.