"त्या " अमेरिकन महिलेचा तो स्वतः केलेला बनावच !
दैनिक तरुण भारत संवादचे वृत्त ठरले तंतोतंत खरे
मयुर चराटकर
बांदा
रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या महिलेचा तो बनावच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दैनिक तरुण भारत संवादने दिलेले ते वृत्त अखेर तंतोतंत खरे ठरले आहे. सदर महिलेवर रत्नागिरी मनोरुग्णालयात उपचार सुरू होते . तिच्या तब्बेतीला आराम मिळाल्यानंतर तिने तेथील वैद्यकीय अधिकारी यांना त्या 'साखळदंडाने बांधून ठेवलेल्या'प्रकरणाची सत्य बाजू सांगितली असून त्यामुळे त्या प्रकरणाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यात तिने म्हटले की मीच स्वतः आपले जीवन संपवुन घेण्यासाठी मडुरा येथील स्थानकात उतरून त्या जंगलात गेली होती. आपला व्हिजा संपला होता तसेच मला माझ्या नातेवाईकांकडून पैसे येणे बंद झाले होते त्यामुळे हा सगळा प्रकार केल्याचे तिने वैद्यकीय अधिकारी यांना सांगितले आहे तशी माहिती तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तरुण भारत सवांदशी बोलताना दिली. या प्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटक सुरक्षित नाही असे चित्र निर्माण झाले होते मात्र दैनिक तरुण भारत सवांदने या प्रकरणाची सत्य बाजू चार दिवस अगोदरच दिली होती ते वृत्त अखेर तंतोतंत खरे ठरले आहे