For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या चरात वृक्षारोपण

02:42 PM Jul 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या चरात वृक्षारोपण
Advertisement

आशिष सुभेदार व सहकाऱ्यांनी केला प्रशासनाचा निषेध

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी शहरात मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या त्या चरांच्या विरोधात अखेर सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करीत निषेध केला. याबाबत तात्काळ संबंधित प्रशासनाने योग्य ती भूमिका घेऊन ताबडतोब हे खड्डे वजा चर सिमेंटकरण करून बुजवावे अन्यथा यापुढे उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. यावेळी पोलीस स्टेशन नजीक असलेला पेट्रोल पंप तसेच शिरोडा नाक्यावरील व आयटीआय परिसरातील व कोलगाव येथे चरांच्या ठिकाणी वृक्षरोपण करून हे आंदोलन करण्यात आले . यावेळी शुभम सावंत ,प्रणित तळकर ,गिरगोल दिया ,मनोज कांबळी, मंदार नाईक ,ओमकार गावडे ,राजाराम चिपकर आदी उपस्थित होते.

Advertisement

पावसाच्या तोंडावर मोबाईल कंपनीने हे चर खोदल्यामुळे शहरातील रस्ते धोकादायक बनले आहेत त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे . तसेच बऱ्याच ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने गाड्या रुतल्याचेही प्रकार होऊन अपघात घडले आहेत. त्यामुळे श्री सुभेदार यांनी मागच्या वेळी वृक्षरोपण करण्याचा इशारा दिल्यानंतर त्या ठिकाणी माती घालून तात्पुरती मलमपट्टी केली होती. परंतु ,मुसळधार पावसामुळे ती माती वाहून जाते त्यामुळे हेच चर आणखी धोकादायक होतात त्यामुळे विशेषतः वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसतो . गेले काही दिवस अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून तात्काळ संबंधित प्रशासनाने सिमेंटकरण करून हे चर बुजवावेत. आज प्रशासनास जाग येण्यासाठी खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन केले आहे. याची दखल घ्या अन्यथा यापुढे उग्र आंदोलन छेडणार असल्याचे श्री सुभेदार व उपस्थित सहकार्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.