महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

... तो जबरदस्तीने घरात घुसू लागला अन्...

02:53 PM Jul 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कणकवली : वार्ताहर

Advertisement

तोंडवली - बोभाटेवाडी येथे एका परप्रांतिय युवकाने परिसरातील काही घरांमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. यात विनोद बोभाटे यांच्या घरात घुसलेल्या युवकाची बोभाटे व कुटुंबियांसोबत झटापटही झाली. यामध्ये बोभाटे यांना किरकोळ दुखापतही झाली. झटापटीनंतर युवक तेथून पसार झाला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान विनोद यांच्या घरातून पसार होताना युवकाकडील आधारकार्डही तेथेच पडले होते. त्यावर छत्तीसगड येथील पत्ता होता.

Advertisement

घटनेची माहिती समजल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मनोज गुरव, नितीन बनसोडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या साथीने रात्री दिड वाजेपर्यंत त्या युवकाचा शोध घेतला. मात्र, युवक सापडू शकला नव्हता. तर युवकाकडून पडलेल्या आधारकार्डावर 'दिनेश कुमार पैंकरा' असे नाव असून 'जशपूर छत्तीसगड' येथील पत्ता होता. सदर युवकाने कमरेला टॉवल बांधलेले होते. ऐन सायंकाळी त्याने अनेकांच्या उघड्या स्थितीमधील घरांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यात एक बंद घर फोडून काही वेळ तो तेथे थांबला होता, अशीही चर्चा होती. कदाचित तो विमनस्क असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घडल्या प्रकाराची शनिवारी दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.

Advertisement
Tags :
# tarun bharat news update # kankavli
Next Article