महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तळवडे येथे किशोर नाईक यांच्या घरावर झाड पडून नुकसान

05:30 PM Jul 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.वादळ व मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे येथे सावंतवाडी वेंगुर्ला मार्गांवर मुरारवाडी याठिकाणी पिंपळ वृक्ष पडल्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक बंद झाली आहे.भला मोठा पिंपळ वृक्ष पण उन्मळून पडला आहे.त्यामुळे विद्युत पुरवठा पूर्ण खंडित झाला आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हा वृक्ष पूर्णपणे महामार्ग बंद पडला आहे.त्यामुळे पूर्णपणे वाहतूक बंद झाली असून वाहन चालक व प्रवासी वर्गाचे मोठी समस्या झाली आहे.तसेच तळवडे मुरारवाडी याठिकाणी किशोर नाईक यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे.तळवडे गावात दोन दिवसापूर्वी तळवडे मिरीस्तेवाडी याठिकाणी पण वडाचा वृक्ष पडला होता.यात शालेय विद्यार्थिनीचा मृत्यु झाला होता तळवडे गावातील दुसरी घटना घडली आहे.सद्या गेले पंधरा दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पूर्ण जागा त्या दलदलीची बनली आहे.त्यामुळे झाडे पडत आहे सद्या वारा व पाऊस पडत असल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य यांना बसत आहे.त्यामुळे झाडे उन्मळून पडत आहे.हि घटना सायंकाळी घडली यावेळी घटना घडल्यावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते तळवडे येथील ग्रामस्थ याच्या सहकाऱ्याने सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्ग मोकळा करण्याचे काम सुरु आहे

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat news # sindhudurg
Next Article