For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन्यथा गणेशमूर्ती महावितरणच्या कार्यालयात आणून ठेऊ

02:39 PM Jul 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
अन्यथा गणेशमूर्ती महावितरणच्या कार्यालयात आणून ठेऊ
Advertisement

दोडामार्गातील मूर्तिकाराचा महावितरणला इशारा

Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर
गेल्या कित्येक दिवसांपासून दोडामार्ग तालुक्यात सततची लाईट नसल्याने सर्व नागरिकांसोबत गणेश मूर्तिकार देखील वैतागलेले आहेत. येऊ घातलेल्या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने मूर्तिकामांना सुरुवात झाली आहे. मात्र लाईट नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी उद्भवू लागल्या आहेत. येत्या दोन दिवसात तालुक्यातील लाईट पूर्ववत न झाल्यास सर्व मुर्तिकाराना घेऊन गणेशमूर्ती महावितरणच्या कार्यालयात आणून ठेऊ असा इशारा शिरवल येथील मूर्तिकार रुपेश सदाशिव घोगळे यांनी दिला आहे.

श्री घोगळे पुढे सांगितले की, गणेश चतुर्थी सण जवळ येत असून आम्हा मूर्तिकारांची तयारी सुरू झाली आहे. गणेश मूर्ती सोबत अन्य देवतांच्या मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र लाईट नसल्यामुळे कामाचा खेळखंडोबा होतो आहे. एकीकडे वाढलेले मातीचे, रंगाचे दर तसेच बाहेरून येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे व्यावसायिक स्पर्धा असताना मूर्ती व्यवसायांमध्ये लाईट नसल्यामुळे आणखीन अडचणी उभ्या राहिल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावे ही खूप दूरवर वसली आहेत. अशा गावांतील मूर्तिकार कसेबसे आपले काम करत आहेत. त्यामुळे काळोखात मूर्ती काम करण्यापेक्षा तालुक्यातील सर्व मूर्तीकारांच्या गणेश शाळांमधील मूर्ती महावितरणच्या कार्यालयात आणून त्या ठिकाणच्या उजेडात मूर्तीकाम करू असे श्री. घोगळे यांनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.