महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आचरा - काझीवाडीत घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान

04:22 PM Jul 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा परिसरात पावसाचा जोर कायम

Advertisement

आचरा | प्रतिनिधी
आचरा परिसरात पावसाचा जोर कायम असून सोसाट्याच्या सुटणाऱ्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून घरांचे,विद्यूत मंडळाचे अतोनात नुकसान होत आहे.गुरुवारी सकाळी आचरा काझीवाडी येथील इम्तियाज मुनिरुद्धीन अहमद काझी यांच्या घरावर आंबा कलम उन्मळून पडल्याने घराचे सुमारे 65 हजाराचे नुकसान झाले. याबाबत आचरा तलाठी संतोष जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील जगन्नाथ जोशी ,नजमुल्ला काझी आदी उपस्थित होते.आचरा देवूळवाडी, मेस्त्री वाडी येथील मंगेश परशुराम मेस्त्री यांच्या परसातील चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने मेस्त्री यांच्या गोबर गॅस सह विहिर ,माड झाडांचे मोठे नुकसान झाले.

Advertisement

विद्यूत मंडळालाही फटका
मुसळधार पावसासोबत जोरदार येणारया वादळी वाऱ्याचा फटका विद्यूत मंडळालाही बसला असून आचरा वरचीवाडी बापर्डेकर पोल्ट्री फॉर्म,काझीवाडा,हिर्लेवाडी आदी भागात विद्यूत तारा तुटून मोठे नुकसान झाले आहे.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news # sindhudurg
Next Article