For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारीही पुन्हा शाळा ,महाविद्यालयांना सुट्टी

10:15 PM Jul 08, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मंगळवारीही पुन्हा शाळा  महाविद्यालयांना सुट्टी
Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

Advertisement

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाने पुन्हा सुट्टी जाहीर केली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे यांनी सुट्टीचे आदेश काढले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती पाहता बऱ्याच ठिकाणी पुलावरुन पाणी वाहत आहे. काही ठिकाणी गावांमधील भागात पाणी आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये तसेच मंगळवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व दक्षता म्हणून सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यानंतर आता जिल्हा प्रशासानाकडून मंगळवारी पुन्हा एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.