ओटवणेत गेल्या महिनाभरापासून विजेचा खेळखंडोबा
उदया ओटवणे उपसरपंचांचे ग्रामस्थांसह कुडाळात उपोषण
ओटवणे | प्रतिनिधी
ओटवणे गावात गेल्या महिनाभरापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधले. परंतु कोणतेही ठोस कार्यवाही न केल्यामुळेच ओटवणे गावातील जनतेला रात्री अक्षरशः काळोखात काढाव्या लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी कुडाळ येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर गुरूवारी २५ जुलै रोज ग्रामस्थांसह उपोषण छेडण्याचा ओटवणे उपसरपंच संतोष कासकर यांनी दिला आहे.याबाबत ओटवणे उपसरपंच संतोष कासकर म्हणतात, गावात दिवसा तसेच रात्री वीज जाणे हे कायमचे झाले आहे. त्यामुळे ओटवणे गावातील नागरिक हैराण असून ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेवर तसेच इतरही कार्यालय कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामूळे महावितरण कंपनीच्या नियोजन शून्य कारभाराबाबत तीव्र नाराजी आहे. वीज वितरणचे अधिकारी आज आणि उद्या असे करीत कोणतीही ठोस कार्यवाही करीत नाही. त्यामुळे दशक्रोशीत महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप आहे.