महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा उन्हाळी सत्र निकाल जाहीर

02:49 PM Jul 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

२३ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ८२ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

Advertisement

सावंतवाडी - यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी उन्हाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के विद्यार्थी हे विशेष प्राविण्य तर ८२ टक्के विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.विद्यापीठाच्या नवीन मुल्यांकन पद्धतीनुसार परीक्षेतील एकूण गुणांची टक्केवारी ही सेमिस्टर ग्रेड परफॉर्मंस इंडेक्स (SGPI) या पद्धतीने जाहीर करण्यात येते. यानुसार विद्यार्थ्यांना एकूण दहा गुणांपैकी मिळालेले गुण जाहीर करण्यात येतात. यामध्ये कॉलेजच्या ज्योती विजय नाटलेकर (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) हिने ९.३५ गुण मिळवत प्रथम, प्रणव विवेक सडवेलकर (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) याने ९.०५ गुण मिळवत द्वितीय तर भावेश चंद्रकांत मुंडये (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) याने ८.७८ गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचे हे पदवी अभियांत्रिकीचे पहिलेच वर्ष असून कॉलेजचा कोकण विभागातील सर्वोत्तम निकाल लागल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य डॉ.रमण बाणे, विभाग प्रमुख स्वप्नील राऊळ व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # news update #
Next Article