महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फुकेरी धरणग्रस्तांना 125 टक्के भरपाई देणार

01:10 PM Jul 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

भूसंपादन आणि मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

फुकेरी धरणासाठी जमीन गेलेल्या जमीन मालकांना 125 टक्के भरपाई देण्याचे आश्वासन भूसंपादन विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. फुकेरी धरणा संदर्भात 18 जुलैला फुकेरी मध्ये जन सुनावणी झाली. या जन सुनावणीच्या वेळी अधिकाऱ्यांनी जमीन मालकांना १२५ टक्के अशी भरपाई देण्याचे आश्वासन दिले . फुकेरी धरणासाठी जमीन मालकांची 42 एकर जमीन जाते. या जमिनीसाठी १२ कोटी रुपये भरपाई देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. फुकेरी धरणाचे भूमिपूजन 2021 मध्ये झाले होते. या धरणाचे पाणी धुळंबे, तळकट, पोलदार ,उबाळे,कळणे आदी गावांना मिळणार आहे. धरणाचे काम भूसंपादन न होता 75 टक्के करण्यात आले. सुमारे 133 कोटीचे हे धरण असून आतापर्यंत ८० कोटीचे धरणाचे काम झाले आहे. या धरणा संदर्भात जमीन मालकांना अलीकडेच भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर 18 जुलैला भूसंपादन आणि मृदा आणि जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जन सुनावणी झाली . या जन सुनावणीच्या वेळी जमीन मालकांनी आपले म्हणणे मांडले. तसेच प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा अशी मागणी करण्यात आली. या जनसुनावणीच्या वेळी जमीन मालकांतर्फे सामाजिक कार्यकर्ते कल्याणकर यांनी बाजू मांडली. धरणाच्या प्रकल्पात ग्रामस्थांची घरे जात नाहीत . परंतु, या ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा अशी मागणी कल्याणकर यांनी केली . भूसंपादन कायद्यानुसार हे शक्य नसल्याचे सांगण्यात आले परंतु यासंदर्भात आपण आवाज उठवणार असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # sindhudurg
Next Article