महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोलगावनंतर ओटवणेतही अळंबी खाल्याने तिघांना विषबाधा

11:17 AM Jul 22, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

बांबोळीत हलविलेल्या दोघांची प्रकृती स्थिर

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

Advertisement

कोलगांव पाठोपाठ ओटवणे येथे रविवारी रात्री अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. एकाच कुटुंबातील तिघांना याचा त्रास जाणवल्यानंतर त्यांना रात्रीच त्वरीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. आता दोघांची प्रकृती स्थिर आहे.
सध्या अळंबीचा हंगाम असून जंगल परिसरात अळंबी आढळून येतात. ही चवदार अळंबी आवडीने खाल्ली जातात. मात्र, काही अळंबी ही विषारी असतात. ही विषारी अळंबी खाल्ल्याने कोलगाव येथे रविवारी सायंकाळी नऊ जणांना विषबाधा झाली होती. त्यानंतर रविवारी रात्री ओटवणे येथील एकाच कुटुंबातील तिघांना प्रकाश लक्ष्मण सोनार ऊर्फ ओटवणेकर (६०) व रामचंद्र विष्णु सोनार (५५ ) आणि त्यांची मुलगी ईशा रामचंद्र सोनार (२२) या तिघांना अळंबी खाल्ल्यानंतर उलटी व जुलाब सुरू झाल्याने त्यांना त्वरीत उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यातील प्रकाश व रामचंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. सोमवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गोवा बांबोळी येथे उपचार घेत असलेल्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Advertisement
Tags :
# tarun Bharat news update #
Next Article