महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीत 27 जुलै ते 19 ऑगस्ट पर्यंत मान्सून महोत्सव

04:11 PM Jul 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन ; सहभागी होण्याचे
सह्याद्री फाउंडेशनचे आवाहन

Advertisement

सावंतवाडी| प्रतिनिधी

Advertisement

सह्याद्री फाउंडेशनचा सन 2024 मान्सून महोत्सव 27 जुलै ते 19 ऑगस्ट २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मान्सून महोत्सवात दरवर्षीप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व , सुदृढ बालक स्पर्धा ,भक्ती गीत गायन स्पर्धा ,रानभाज्या स्पर्धा, गरजू विद्यार्थ्यांना मदत व शैक्षणिक साहित्य वाटप,होतकरू दशावतार नाट्य मंडळांना आर्थिक मदत,अशा विविध उपक्रमाने यंदा मान्सून महोत्सव साजरा होणार आहे असे सह्याद्री फाउंडेशन च्या झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले अशी माहिती. संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

सैनिक पतसंस्थेच्या शहर कार्यालयात श्री राऊळ यांच्या उपस्थित बैठक झाली . यावेळी अध्यक्ष रवींद्र मडगावकर, माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब. ,विजय चव्हाण,सचिव प्रताप परब ,ऍड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे ,माजी सभापती प्रमोद सावंत ,विभावरी सुकी ,हर्षवर्धन धारणकर ,सुहास सावंत, संजय मडगावकर आदी उपस्थित होते. या बैठकीत यंदाचा मान्सून महोत्सवचा शुभारंभ 27 जूनला सह्याद्री पट्ट्यात वक्तृत्व ,स्पर्धा व शैक्षणिक साहित्य वाटप ,गुणवंत विद्यार्थी गौरव हे कार्यक्रम कलंबिस्त पंचक्रोशीत घेण्यात येणार आहे. 19 ऑगस्टला सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहेत . शैक्षणिक साहित्य वाटप 27 जुलै पासून ते ३ ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. तर 4 ऑगस्टला सावंतवाडी आदिनारायण मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता सुदृढ बालक स्पर्धा तर 11 ऑगस्टला सायंकाळी चार वाजता रानभाजी स्पर्धा आदिनारायण मंगल कार्यालय येथे होणार आहे. 18 ऑगस्टला भक्तिगीत गायन स्पर्धा सायंकाळी ४ ते ८ विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे, तर 27 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता कलंबिस्त हायस्कूल येथे सह्याद्री पट्ट्यातील शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत तर 19 ऑगस्टला महोत्सवाचा समारोप केला जाणार आहे . यावेळी दशावतार नाटक आणि दशावतारकंपनीला आर्थिक मदत केली जाणार आहे. वकृत्व स्पर्धा 27 जुलैला होणार आहे याबाबतची नावे कलंबिस्त हायस्कूल मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्याकडे नोंदवावीत तरी सर्वांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # news update # konkan #
Next Article