For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरिनाम वीणा सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास विनायक राऊतांची भेट

01:13 PM Jul 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
हरिनाम वीणा सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास विनायक राऊतांची भेट
Advertisement

सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात बळीराजासाठी घातले साकडे

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी संस्थानकालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामधील अखंड हरिनाम विणा सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास माजी खासदार आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत हजेरी लावली व श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सर्वाना सुखात, आनंदात ठेव, बळिराजावर कृपा कर ! असे साकडे घातले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब दोडामार्ग उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी चंद्रकांत कासार युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट कौस्तुभ गावडे कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब, वेंगुर्ला शहरप्रमुख अजित राऊळ, संदीप म्हाडेश्वर, संदीप पेडणेकर आदी उपस्थित होते.याशिवाय प्रसन्ना उर्फ नंदू शिरोडकर माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर नंदू गावडे जिल्हा परिषद माजी सभापती मंगेश तळवणेकर यांच्यासह विठ्ठल भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेश्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम वीणा सप्ताह मध्ये गेले सात दिवस अर्णव बुवा, गडहिंग्लज व गीतगंधा गाड, गोवा यांचा भक्तीगीत व नाट्य संगीत सुमधूर कार्यक्रम तसेच नवार वारकरी भजन मंडळ, वेंगुर्ला यांचं भजन शिवाय महिला भजन, महापुरुष धावडेकर वारकरी भजन, वारकरी भजन सोनसुरे, सिद्धेश्वर भजन मंडळ तळवडे यांचा भजनाचा कार्यक्रम झाला हरिनाम वीणा सप्ताहाची सांगता सोहळ्यास माजी खासदार विनायक राऊत यांनी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी विठ्ठल मंदिर सप्ताह उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली त्याशिवाय माजी नगरसेवक गुरु मठकर ,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष साक्षी वंजारी, शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हा संघटक ॲड नीता सावंत कविटकर यांच्यासह अनेक विठ्ठल भक्तांनी या सप्ताहात सहभाग घेतला.

Advertisement

आषाढी एकादशीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम

दरम्यान, बुधवारी १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सायं. ६ वा. ह.भ.प. संज्योतताई केतकर पुणे यांच किर्तन होणार आहे‌. याच वेळेत सलग २१ जुलै पर्यंत त्या किर्तनरूपी सेवा करणार आहेत. रविवारी २१ जुलैला दहीकाल्याने सांगता होणार आहे

Advertisement
Tags :

.