गुहागर समुद्रामध्ये नौकेला जलसमाधी
10:16 PM Jul 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
तीन खलाशांना वाचवण्यात यश
Advertisement
प्रतिनिधी | गुहागर
मासेमारी बंदी कालावधी संपुष्टात येत असताना डागडुजी व पूर्वतयारीसाठी गुहागर समुद्र चौपाटीकडे येणा-या एका मासेमारी नौकेला रविवारी सकाळी ७ वाजता जलसमाधी मिळाली. सुदैवाने जोडीला आणखी एक नौका असल्याने नौकेवरील तीन खलाशी सुखरूप समुद्रकिनारी पोहोचले. गुहागर तालुक्यातील असगोली येथील ‘शिवाय' ही नौका असगोली येथून गुहागर समुद्रकिनारी येत असताना वारा व लाटांमुळे पाच वाव (१० मीटर खोल) समुद्रात बुडाली.
Advertisement
Advertisement