महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीतील चिमुकल्यांनी काढली आषाढी एकादशी निमित्त दिंडी

04:48 PM Jul 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 15 च्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विठू नामाचा गजर करत तुळशी पताका घेऊन दिंडी काढली. यावेळी विठ्ठलाच्या वेशभूषेत मिहान चव्हाण तर रखुमाईच्या वेशभूषेत रिद्धीमा किटलेकर दिंडीमध्ये सहभागी झाले होते . या तीन वर्षाच्या चिमुकल्यामध्ये श्री विठ्ठलाची सजलेली पालखी घेऊन पालखीचे भोई -राजवीर दळवी, शौर्य नीरतवडेकर हे बनले होते . तर या विठू नामाच्या दिंडीमध्ये वारकरी चिमुकले समर्थ काष्टे, रोहित मुंज, भार्गवी मुंज, दिया पेडणेकर, प्रिशा भिसे,सावी नेवगी,प्राप्ती गवळी, काव्या गावडे, विशाखा साटेलकर, विराज लाखे, रुद्र लाखे, साईश करपे, जॉय डिसोजा, स्वराज गोरे, युवराज गावडे, प्रियांशी गुप्ता, योगिता पाटील सहभागी झाले होते. छोट्या मुलींची डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठू नामाचा गजर करत ही दिंडी माठेवाडा येथून शहरातील संस्थानकालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये दाखल झाली. यावेळी विठुराया आणि रखुमाई यांच्या वेशातील मुलांनी प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि जयघोष केला. यामध्ये मुलांचे पालक तसेच अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार ,अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर यांच्यासह खुशी पवार, गौरव बांदेकर ,साहिल सासोलकर, पालक स्वानंदी नेवगी पूजा मुंज ,राधिका मुंज आदी सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # sindhudurg
Next Article