For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे नाही , नोकरी देणारे बना

05:48 PM Feb 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे नाही   नोकरी देणारे बना
Advertisement

एम.एस. एम. ई मंत्रालयाचे फिल्ड ऑफिसर प्रतीक पराशर यांचे सावंतवाडीत प्रतिपादन ; देशभक्त गवाणकर कॉलेजात “उद्योजकता जागृती कार्यक्रम''

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

 “विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे न राहता नोकरी देणारे बनावे, असे  मत एम. एस. एम. इ मंत्रालयाचे फिल्ड ऑफिसर तथा कोल्हापूर केंद्रप्रमुख प्रतीक कुमार पराशर यांनी येथे केले भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) तर्फे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर “उद्योजकता जागृती कार्यक्रम” अंतर्गत देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि तांत्रिक संस्थांमध्ये विशेष कार्यशाळा व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. सावंतवाडीच्या देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्वयंपूर्णतेकडे वळवणे, स्टार्टअप संस्कृतीला चालना देणे आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा आहे. तज्ज्ञ उद्योजक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि बँकिंग क्षेत्रातील अधिकारी विद्यार्थ्यांना व्यवसाय संकल्पना, आर्थिक नियोजन, शासकीय योजना आणि कर्ज सुविधा याबाबत मार्गदर्शन करत आहेत.या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), स्टँड-अप इंडिया, तसेच विविध कौशल्य विकास योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात आहे. अनेक ठिकाणी यशस्वी उद्योजकांच्या अनुभवकथनांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रेरणा मिळत आहे.मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे न राहता नोकरी देणारे बनावे, हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू आहे.” या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भविष्यात अधिक व्यापक स्तरावर तो राबविण्याची योजना आहे.उद्योजकता जागृती कार्यक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुणांमध्ये उद्योग क्षेत्राविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.