For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साटेली- भेडशीत वीज ग्राहकांनी उपअभियंत्याना धरले धारेवर

05:26 PM Jul 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
साटेली  भेडशीत वीज ग्राहकांनी उपअभियंत्याना धरले धारेवर
Advertisement

नियमित खंडित होणाऱ्या विजेबद्दल विचारला जाब

Advertisement

साटेली भेडशी प्रतिनिधी

साटेली भेडशी पंचक्रोशीतील विजग्राहकांची भेडशी येथील दामोदर सभागृहात गुरूवारी सकाळी बैठक पार पडली. या बैठकीला वीज वितरण महामंडळ दोडामार्ग तालुका उपअभियंता श्री.नलावडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांना उपस्थित वीज ग्राहकांनी नियमित खंडित होणाऱ्या,तसेच ग्रामीण भागातील गावांना सलग चार ते पाच दिवस पूर्णपणे अंधारात राहावे लागत आहे याबद्दल जाब विचारला.

Advertisement

या बैठकीचे आयोजन वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या वतीने यांनी केले होते. यावेळी वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा समनव्यक नंदन वेंगुर्लेकर, तालुका अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, नंदकुमार टोपले, सनी केसरकर,शिवदास मणेरकर, पांडुरंग मोरजकर आदी विजग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिकूळे, उसप,मांगेली आदी गावातील विजग्राहकांनी तालुका उपअभियंता यांना विजेच्या समस्यांबाबत धारेवर धरले. उसपचे माजी सरपंच दिनेश नाईक, आनंद शेट्ये (तिलारी), एस ए गवस पिकूळे, यांनी आपल्या गावात विजेच्या समस्यांचा पाढाच वाचला.वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा समनव्यक ऍड नंदन वेंगुर्लेकर यांनी विजग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निवारण करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न करून त्या सोडविण्यात येतील असे सांगितले.

Advertisement
Tags :

.