महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बाळा गावडे यांच्या माध्यमातून कोलझर येथे छत्री वाटप

03:37 PM Jul 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी
बांदा
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुक्यात कोलझर येथे छत्र्या वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दोडामार्ग दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत दिव्यांग व निराधार बांधवांना व भगिनींना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्याकडून छत्र्या वाटप करण्यात आल्या माजी खासदार विनायकजी राऊत साहेब, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर साहेब, जिल्हाप्रमुख संजयजी पडते साहेब यांच्या मार्गदर्शनातून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम घेऊन आठवडा सप्ताह साजरा करण्यात येणार सदर कार्यक्रमास जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुकाप्रमुख संजय गवस, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, उप तालुका प्रमुख मिलिंद नाईक, युवा सेना अधिकारी मदन राणे, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे तसेच सावंतवाडी उपतालुका प्रमुख व सावंतवाडी एसटी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख श्री.आबा सावंत, सावंतवाडी युवा सेना अधिकारी ॲड. कौस्तुभ गावडे संघटनेचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा शाल श्रीफळ देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रास्ताविक दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले तर तालुकाप्रमुख संजयजी गवस यांनी आपले विचार मांडले. त्याचबरोबर जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या संघटनेतील कर्तृत्व आणि काम आणि आपली संघटना कशी जिवंत ठेवली पाहिजे या संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # news update #
Next Article