महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुरे दगावलेल्या शेतकऱ्याला बिळवस ग्रामपंचायतीकडून आर्थिक मदत

11:50 AM Jul 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

बिळवस सरपंच मानसी पालव यांचा आदर्श उपक्रम

Advertisement

मसुरे | प्रतिनिधी

Advertisement

बिळवस दत्त मंदिर येथे शुक्रवारी दुपारी वीज वितरण च्या हलगर्जीपणामुळे विजेचा शॉक लागून बिळवस येथील चंद्रकांत आबा पाताडे या शेतकऱ्याचे तीन बैल मृत्युमुखी पडले होते. सुमारे पावणे दोन लाख रुपयाचे नुकसान या गरीब शेतकऱ्याचे झाले आहे. याबाबत बिळवस ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ मानसी पालव या सर्वप्रथम धावून गेल्या होत्या. या गरीब शेतकऱ्याचे शेती हंगामात बैल मृत्युमुखी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत या घटनेची जाणीव ठेवून बिळवस ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच सौ मानसी पालव, ग्रामसेवक युगल प्रभू गावकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, ग्रामसेवक युगल प्रभू गावकर , मनोज पालव, संजय पालव, अरुण पालव, शुभम पालव, राम पालव, लक्ष्मण पालव, मोहन पालव, समीर पालव, राहुल सावंत, श्रीधर नाईक, राजू पालव, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत च्या सहकार्याबद्दल चंद्रकांत पाताडे आणि कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # masure # bilwas # sindhudurg
Next Article