For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुण भारत, फार्म एक्सप्रेसतर्फे घरगुती गणेशमूर्ती सजावट स्पर्धा ; राज्यभरातील गणेश भक्तांना बक्षिसे जिंकण्याची संधी, 25 सप्टेंबर अंतिम तारीख

11:21 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
तरुण भारत  फार्म एक्सप्रेसतर्फे घरगुती गणेशमूर्ती सजावट स्पर्धा   राज्यभरातील गणेश भक्तांना बक्षिसे जिंकण्याची संधी  25 सप्टेंबर अंतिम तारीख
Advertisement
पणजी : गणेशोत्सवाच्या मंगलमय बातावरणात घरगुती गणेशमूर्ती आणि आकर्षक सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यातील लोकप्रिय मराठी दैनिक 'तरुण भारत' आणि 'फार्म एक्सप्रेस' यांच्या संयुक्त विद्यमाने 'आमचा गणपती घरगुती आकर्षक गणेशमूर्ती व सजावट स्पर्धा-2026 आयोजित करण्यात आली आहे.
गोव्यातील गणेशभक्त व दै. 'तरुण भारत च्या वाचकांसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा विनामूल्य असून, आपल्या घरातील गणेशमूर्ती आणि सजावटीचे वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र अथवा व्हिडिओ पाठवून सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची आकर्षक बक्षिसे, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी रोख 13 हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी रोख 10 हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख 8 हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र, चतुर्थ क्रमांकासाठी रोख 6  हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र आणि पाचव्या क्रमांकासाठी रोख 4 हजार रुपये चषक व प्रमाणपत्र, तसेच उत्तेजनार्थ पाच बक्षिसे प्रत्येकी रोख 2 हजार रुपये, चषक व  प्रमाणपत्र अशी बक्षिसे जिंकता येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील गणेशमूर्ती व सजावटीचे आकर्षक छायाचित्र तसेच कुटुंबासोबतचे छायाचित्र व पूजेचा 30 सेंकदाचा व्हिडिओ पाठवणे आवश्यक आहे. सहभागी स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा. स्पर्धकांनी केवळ स्वतःच्या घरातील गणेशमूर्ती, सजावट, कुटुंबाचे छायाचित्र व पूजेचा व्हिडिओ पाठवावा. स्पर्धेसाठी अन्यत्रून घेतलेली किंवा पुनरुत्पादित केलेली छायाचित्रे तसेच एआय निर्मित छायाचित्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत.
स्पर्धकांनी पाठविलेल्या छायाचित्रांमध्ये अथवा व्हिडिओमध्ये त्यांचा सहमाग व  घरातील  सजावटीचे वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. स्पर्धेतील सर्व अधिकार दै 'तरुण भारतच्या व्यवस्थापनाकडे राखीव असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांना बंधनकारक राहणार आहे.
विजेत्यांची नावे तसेच वक्षीस वितरणासंबंधीची माहिती है. 'तरुण भारत' मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. स्पर्धेचे परीक्षण क्षेत्रातील तज्जांकडून करण्यात येणार आहे. 'आमचा गणपती, आमचा आस गणपतीसाठी सजवा घर खास' या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमुळे गोव्यातील घराघरांतील गणेशोत्सवातील कलात्मकता, पारंपरिकता आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक गणेशभक्तांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
स्पर्धकांनी आपले फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअॅप क्रमांक 9881714586  वर पाठवावेत, फोटो अथवा व्हिडिओसोबत स्पर्धकाचे पूर्ण नाव व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेसाठी सहभागाची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी आपल्या घरातील आकर्षक गणेशमूर्ती, सजावट, देखावा आणि गणेशोत्सवातील सर्जनशीलतेचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रे व व्हिडिओ वेळेत पाठवून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.