विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी 'तरुण भारत चॅम्पियन' मार्गदर्शक
कोल्हापूर :
विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. भविष्यात स्पर्धा परीक्षाकरिता तरुण भारत संवाद चॅम्पियन सामान्य ज्ञान स्पर्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. या दैनिकाचे विद्यार्थ्यांसाठी दर शनिवारी असलेले चॅम्पियन सदर विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्ती व ज्ञानात भर टाकणारे असल्याचे प्रतिपादन आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे यांनी केले.
आदर्श गुरुकुल विद्यालय येथे तरुण भारत संवाद चॅम्पियन सामान्य ज्ञान स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्राचार्य डॉ. घुगरे बोलत होते. यावेळी सचिव तथा मुख्याध्यापिका एम. डी. घुगरे, पर्यवेक्षक एस. जी. जाधव, प्रशासक एस. ए. पाटील, समन्वयक एस. डी. माने, आर. एस. नलवडे, ए. पी. रोंगटे आदी उपस्थित होते.