For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

300 दशलक्ष टन दुध उत्पादनाचे ध्येय

06:46 AM Mar 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
300 दशलक्ष टन दुध उत्पादनाचे ध्येय
Advertisement

देशाचे दूध उत्पादन जागतिक स्तरावर पाहता 300 दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांमध्ये हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी सरकारने राष्ट्रीय गोकुळ मिशन ही योजना 2014 मध्ये सुरू केली असून या अंतर्गत देशातील दूध उत्पादनामध्ये 63 टक्के इतकी वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर पाहता दूध उत्पादनामध्ये भारत हा आघाडीवरचा देश आहे. येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये 300 दशलक्ष मेट्रिक टन इतक्या दुधाचे उत्पादन करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. सध्याला पाहता भारत देशात 249 दशलक्ष मेट्रिक टन इतक्या दुधाचे उत्पादन घेतले जात आहे. केंद्रीय पशु पालन आणि डेअरी विभागाचे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी लोकसभेमध्ये ही माहिती दिली आहे.

Advertisement

आगामी पाच वर्षांमध्ये वर निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून 3 वर्षांमध्येच 15 टक्के इतके वाढीव उत्पादन साध्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर पाहता दूध उत्पादनामधला भारत हा सर्वात मोठा देश ठरला आहे. देशातील दूध उत्पादनाचा विचार करता आजघडीला जवळपास 10 कोटी लोक दूध उत्पादनाशी जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून दूध उत्पादनासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जात असून सरकारही त्यांना प्रोत्साहन देत आहे.

काहीजण शेती करण्यासोबत जोडधंदा म्हणून दुध उत्पादन घेतात. देशातील शहरीपेक्षा ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय अधिक दिसून येतो. या व्यवसायातसुद्धा महिलांचे योगदान 75 टक्के इतके आहे. सध्याला देशामध्ये पाहता प्रतिव्यक्ती दुधाचा वापर हा 471 ग्राम इतका केला जातो. पशुपालन आणि डेअरी उद्योग विभागाकडून राष्ट्रीय गोकुळ मिशनचे आयोजन करण्यात आले आहे. दूध उत्पादनाशी संबंधित असलेल्या गाई-म्हशी यांच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहेत. दूध उत्पादनामध्ये वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.

Advertisement

सरकार दुग्ध उत्पादकांना आवश्यक वाटल्यास अर्थसहाय्यही पुरवत असते. त्याचप्रमाणे तांत्रिक मदतही केली जाते. कर्जाच्या माध्यमातूनही दुध उत्पादकांना सक्षम करण्याचा प्रयत्न होतो. डेअरी पायाभूत सुविधा, विपणन, दर्जा नियंत्रण, पोषक खाद्य, विमा यासारख्या बाबतीत सरकार नेहमीच सहकार्यासाठी पुढे असते.

2024 मध्ये उत्पादनाचा विकास दर 3.78 टक्के इतका राहिला जो याच्या मागच्या वर्षी 3.8 टक्के इतका होता. याआधीच्या वर्षामध्ये पाहता आर्थिक वर्ष 2018 मध्ये उत्पादन दर 6.62 टक्के इतका सर्वाधिक होता. त्यानंतर 2019 मध्ये 6.47 टक्के, 2020 मध्ये 5.69 टक्के, 2021 मध्ये 5.81 टक्के, आर्थिक वर्ष 2022 मध्ये 5.77 टक्के इतका दर होता.

भारताला दूध उत्पादनाच्याबाबतीत 2030 पर्यंत 30टक्के इतका वाटा उचलायचा आहे. काही तज्ञांच्या मते दुग्धोत्पादन क्षेत्राचा विकास पुढील 5 वर्षात वार्षिक 9 टक्के राहील असा अंदाज आहे.

-दीपक कश्यप

Advertisement
Tags :

.