Sangli News : आटपाडीच्या नागरी भागात तरस विहिरीत अडकला; रेस्क्यु मोहिम यशस्वी
नागरी परिसरात पहिल्यांदाच तरस
आटपाडी : नागरी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव चिंताची बाब बनलेली असतानाच आटपाडीमध्ये विहिरीत पडलेला तरस आढळला. रिंग असलेल्या विहिरीतील मध्यभागी असणाऱ्या कठ्यावर असलेल्या तरसाला प्राणीमित्र आणि बन्यविभागाने सुरक्षीतपणे बाहेर काढून सुरक्षीत अधिवासात सोडले. प्रथमच आटपाडीच्या नागरी भागापर्यंत तरस पोहचल्याची गोष्ट उजेडात आली. या तरसाची रेस्क्यु मोहिम सुमारे अडीच तास चालली.
आटपाडी तालुक्यात लांडगे, कोल्हे, तरस यांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे. डोंगराळ भागात असलेले हे अस्तित्त्व आत्ता लोकवस्ती असलेल्याठिकाणी आढळल लागले आहे. भिवघाटाच्या पायथ्याशी नियमीत आढळणारा तरस हा प्राणी आटपाडी शहरात घुसला. खाद्याच्या शोधात हा तरस रामोशीवाडा येथे गजानन सुतार यांच्या वि-ि हरीत आढळला.
बीस ते पंचवीस फुट खोल विहिरीच्या आत एक ते दीड फुट रुंदीच्या खुल्या जागेत रिगलगत बसला होता.
हा तरस सर्वप्रथम सागर मंडले यांनी पाहिला. त्याची माहिती प्रा. गौरव चव्हाण यांना दिली. त्यांनी सर्पमित्र मंगेश अंमलदार, प्रा. शिवा-जी विभुते यांना तरस विहिरीत पडल्याचे कळविले. या घटनेची माहिती वनरक्षक दादा बजबळकर यांना मिळताच ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. नगरसेवक अजित जाधव, अश्विन नांगरे, सतिश नांगरे, सचिन माळी, सतपाल पाटील, वनविभागाचे हणमंत कटरे, जितेंद्र गिडे, प्रविण गायकवाड यांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर तरसाला सुरक्षितपणे बाहेर काढले. नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.