महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ताराराणी हायस्कूलच्या हॉकी संघाची निवड

10:51 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी हायस्कूल खानापूर या शाळेने आपला शैक्षणिक आलेख कायम उंचावत ठेवला आहे. बौद्धिक स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांनी तालुक्यात अव्वलस्थानी नेहमीच असतात. यावर्षी घेण्यात आलेल्या सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या डिव्हिजनल व्हॉकी स्पर्धेत खानापूरचे नेतृत्व करणाऱ्या या संघाने जिल्ह्यात अव्वलस्थानी मजल मारत मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा झेंडा फडकविला आहे. म्हैसूर राज्यस्तरीय दसरा क्रीडा स्पर्धेसाठी या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.

Advertisement

या संघात मयुरी कंग्राळकर, नेत्रा गुरव, साक्षी पाटील, साक्षी चौगुले, आयेशा शेख, सविता चिकदिनकोपकर, प्रतीक्षा गुरव, सानिका पाटील, प्रीती नांदुडकर, श्रेया पाटील यांना क्रीडाशिक्षिका आश्विनी टी. पाटील व वाय. एफ. निलजकर क्रीडाशिक्षक सुधाकर चाळके, हॉकी जनरल सेक्रेटरी बेळगाव, मुख्याध्यापक राहुल एन. जाधव, मुख्याध्यापक के. व्ही. कुलकर्णी, प्राचार्य ए. एल. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन मिळाले. संचालक शिवाजीराव पाटील व ज्येष्ठ संचालक परशराम गुरव यांची प्रेरणा मिळाली आहे. व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article