For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसगाव जमीन फसवणूकप्रकरणी तारक आरोलकर यांच्या फ्लॅट आणि कार्यालयावर ईडीचे छापे

11:28 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आसगाव जमीन फसवणूकप्रकरणी तारक आरोलकर यांच्या फ्लॅट आणि कार्यालयावर ईडीचे छापे
Advertisement

म्हापसाः आसगाव येथील जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेल्या पेडे -म्हापसा येथील संशयित तारक -मंगेश आरोलकर याच्या पेडे म्हापसा तसेच म्हापसा जिल्हा रुग्णालयाजवळील कार्यालयावर ईडीने छापा मारल्याचे वृत्त आहे.
मंगळवारी सकाळपासून दिवसभर इडीचे अधिकारीवर्ग त्याच्या निवासस्थानी व कार्यालयात चौकशी करीत होते. त्यांच्याबरोबर पोलिसवर्गही उपस्थित होता. अधिकारीवर्गाने त्याच्या कार्यालयातील बेहिशोबी मालमत्ता आणि जमिनीच्या फाईल्स तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. सध्या तारक आरोलकर पेडे क्रीडा मैदानाजवळ भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असून सकाळी ईडीने त्याच्या निवासस्थानी छापा मारल्याचे वृत्त आहे. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यातआला होता.

Advertisement

घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे, दागिने व रोख रुपयेही जप्त केल्याची माहिती हाती आली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत त्याच्या निवासस्थानी पोलिस पहारा होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.